Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईDisha Salian l दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची याचिका न्यायालयानं फेटाळली

Disha Salian l दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची याचिका न्यायालयानं फेटाळली

मुंबई l अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियान Disha Salians हिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी सुशांतचा देखील मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर दोघांचाही मृत्यूमध्ये काही तरी समान धागा आहे असा संशय दिल्लीतील एक वकिल पुनीत दांडा यांनी व्यक्त केला होता. शिवाय या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील केली जावी यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वाचा l उद्या धमाका, संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो

मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. जर कोणाकडे या प्रकरणावर आधारित काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे असेही आदेश कोर्टाने दिले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्याची घटना आठ जून रोजी समोर आली होती.

आत्महत्येनंतर ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यामुळे बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात आहेत. पण त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, हे तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने सुशांतच्या काही दिवसांआधीच आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पण त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, हे तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं आहे.

दिशाच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला दिशा, तिचा होणारा पती रोहन, आणि मित्र हिमांशू, नील व दीप हे उपस्थित होते. ‘इंडिया टुडे’ला दिशाच्या मैत्रिणीने त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याची माहिती दिली. पार्टीत सर्वांनी मद्यपान केलं होतं.

मद्यपानानंतर दिशा फार भावूक झाली आणि तिची कोणाला काळजीच नाही असं वारंवार बोलत होती. त्यानंतर रात्री तिने युकेतील एका मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्याच्याशी फोनवर बोलत असतानाच दिशा दुसऱ्या रुममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला.

वाचा l MNS l वीज बिल भरु नका; राज ठाकरेंचा एल्गार

बराच वेळ झाल्यामुळे दिशाच्या मित्रांनी मिळून दरवाजा तोडला. पण रुममध्ये दिशा कुठेच नव्हती. जेव्हा हिमांशू आणि दीपने खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सर्वजण खाली धावत गेले पण तोपर्यंत दिशाचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments