Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजप सरकार आरएसएसच्या इशा-यावर काम करते : अशोक गेहलोत

भाजप सरकार आरएसएसच्या इशा-यावर काम करते : अशोक गेहलोत

Ashok Gehlotमुंबई: भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर काम करत आहे. भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड संसदेच्या आधी आरएसएसच्या प्रमुखांकडे सादर केले जाते. भाजप सरकारच्या काळात देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे मतदानाच्या ताकदीचा वापरून लोकशाही वाचवण्याची हीच वेळ आहे असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.

मुंबईत राजीव गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षे आपल्या भारत देशात लोकशाही टिकवून ठेवली. देशाच्या तुकडे होऊ दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादाचा मुखवटा घालून विरोधी पक्षांना देशद्रोही ठरवत आहेत. नरेंद्र मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे तसेच शास्त्रज्ञाच्या कार्याचे स्वतःसाठी भांडवल करतात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप सरकार त्यांच्या जाहीरनाम्यातील वचनांबद्दल, त्यांच्या योजनांबद्दल, ध्येय धोरणांबद्दल, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय करणार या गंभीर मुद्द्यांवर काहीच बोलत नाही आहे. फक्त भावनिक मुद्द्यांवर बोलत आहे. भाजप सरकार नेहमीच जुने भावनिक मुद्दे बाहेर काढून निवडणूक जिंकत आलेली आहे, असे उद्गार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काढले. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, उपाध्यक्ष आणि माजी आमदार चरण सिंग सप्रा, उपाध्यक्ष कुंवर सिंग राजपूत उपस्थित होते.

अशोक गेहलोत पुढे म्हणाले कि सुप्रीम कोर्ट, सीबीआय, निवडणूक आयोग यूपीएससी, सीएजी या सारख्या संविधानिक संस्था धोक्यात आलेल्या आहेत. भारताच्या इतिहासात असे पहिल्यांनदाच झाले कि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतली आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढले. RBI, ED, CBI, IT, NSSO यांची स्वतंत्रता हि धोक्यात आलेली आहे. या सर्व संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना टार्गेट करायचे हे या सरकारचा अन्याय आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –

नरेंद्र मोदी यांची जुमलेबाजी –
१. अच्छे दिन, काळा पैसा, प्रत्येक भारतीयांच्या खात्यामध्ये १५ लाख जमा होणार
२. २ करोड नोक-या त्यामध्ये १५ लाख नोकऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये देणार असे आश्वासन दिले होते. २०१४ च्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख आहे
३. राष्ट्रवादाचा खोटा प्रचार करून बेरोजगारीचे दुःख कमी होणार नाही आहे
४. डॉलरच्या मानाने रुपयाची घसरण सुरूच आहे
५. पेट्रोल आणि डिझेल व घरगुती गॅस यांचे प्रचंड वाढलेले दर हि चिंतेची बाब झालेली आहे

भारतावर कर्ज वाढले –
१. भाजप सरकारच्या काळात भारतावरील कर्ज वाढून ५५ लाख चे आता ८२ लाख करोड एवढे झालेले आहे
२. गरिबांच्या समस्येवर गेल्या ५ वर्षात काहीच तोडगा निघाला नाही

प्रसिद्धी आणि परदेशी दौर्यावर प्रमाणाच्या बाहेर खर्च –
१.  नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौरे आणि प्रचार यांच्या जाहिरातींवर अरोबो रुपयांचा निरर्थक खर्च करण्यात येत आहे
२. नरेंद्र मोदी हे प्रधान मंत्री नसून प्रचार मंत्री म्हणून काम करत आहेत
३. ग्लोबल हंगर इंडेक्स २०१८ च्या रिपोर्टनुसार आपला भारत देश १०० व्या स्थानावर आलेला आहे. २०१४ मध्ये ५५ व्या स्थानावर आपण होतो

राष्ट्रवादाचा खोटा चेहरा –
१. नरेंद्र मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे तसेच शास्त्रज्ञाच्या कार्याचे स्वतःसाठी भांडवल करतात
२. आमच्या काँग्रेसच्या काळात अंतराळातील ए सॅट मिसाईलचे काम सुरु झाले होते
३. नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादाचा मुखवटा घालून विरोधी पक्षांना देशद्रोही ठरवत आहेत
४. राफेल प्रकरण उघडकीस आले परंतु ते पद्धतशीररित्या बाजूला करण्यात आले त्यांची चौकशी हि केली नाही

आपली लोकशाही धोक्यात आहे –
१. सुप्रीम कोर्ट, सीबीआय, निवडणूक आयोग यूपीएससी, सीएजी या सारख्या संविधानिक संस्था धोक्यात आलेल्या आहेत
२. भारताच्या इतिहासात असे पहिल्यांनदाच झाले कि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतली आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढले.  RBI, ED, CBI, IT,  NSSO यांची स्वतंत्रता हि धोक्यात आलेली आहे
३. या सर्व संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना टार्गेट करायचे हे या सरकारचा अन्याय आहे. पी चिदंबरम, श्री हुडडा, तेजस्वी यादव, मायावती आणि अखिलेश यादव अशी अनेक उदाहरणे आहेत
४ मतदानाची ताकद वाढवून लोकशाही वाचविण्याची खरी वेळ आलेली आहे

दोन लोकांचेच शासन सुरु आहे –
१. नरेंद्र मोदी आणि  अमित शहा या दोनच लोकांचे शासन भारतात सुरु आहे. भाजप सरकार मध्ये हि फक्त या दोघांचेच राज्य चालते आहे
२. भाजप सरकारचे जे प्रमुख मार्गदर्शक होते त्यांना पार्टीतून बाजूला करण्यात आलेले आहे
३. भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड संसदेच्या आधी आरएसएसचे प्रमुख आहेत त्यांना सादर केले जाते

मिडीयांवर सुद्धा दबाव –
१. भारतातील प्रमुख चौथा स्तंभ म्हणजे मीडिया पण त्यांच्या वर सुद्धा द्वेषपूर्ण कारवाई आणि दबाव आणला जात आहे

सर्जिकल स्ट्राईक –
१. सर्जिकल स्ट्राईक चा नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक फायदा करून घेतला. जवानांच्या शौर्याचे राजकारण केले. इंदिरा गांधी यांनी तर त्यांच्या काळात भूगोलच बदलून टाकला होता. १९७१ च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या जनरल सहित ९० हजार पाकिस्तानी सैनिकांचे समर्पण केले होते. युद्ध जिंकले होते.
२. काँग्रेसच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राईक केले होते पण त्याचे कधीच राजकारण केले नव्हते

नोटबंदी –
१. नरेंद्र मोदी यांचा नोटबंदी हा हुकूमशाही निर्णय होता त्यामुळे देशातील जनता बँकेच्या रांगेत उभी राहिली. आतंकवाद काही कमी झाला नाही, काळा पैसा परत आला नाही, भ्रष्टाचार कमी झाला नाही मात्र आपल्या भारताची अर्थव्यवस्था नष्ट झाली. याउलट नवीन नोटा छापण्यासाठी करोडो रुपये विनाकारण खर्च झाले. या निर्णयामुळे एक करोड दहा लाख नोकऱ्या सुद्धा गेल्या.
२. काँग्रेसच्या काळात २०११-१२ मध्ये बेरोजगारीचा दर २.२ टक्के होता तो आता भाजपच्या काळात २०१७ – १८ मध्ये ६.१ टक्के एवढा झालेला आहे. गेल्या ४५ वर्षात असे कधी झाले नव्हते.

जीएसटी –
१. भाजप सरकारने जीएसटीची अंमलबजावणी संपूर्णतः चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. जीएसटीमुळे अनेक व्यापार, उद्योग धंदे, स्मॉल स्केल इंडस्ट्री नष्ट झालेल्या आहेत.

जनतेला उत्तरे पाहिजे आहेत –
१. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, १०० स्मार्ट सिटी, उज्वल योजना, जन धन योजना या सर्व योजना फ्लॉप झालेल्या आहेत. जनता याचे उत्तर मागत आहेत
२. आयुष्यमान भारत योजनेतीचे बजेट ३००० करोड होते ते कमी करून २४०० करोड केले. हे अर्ज सर्व सामान्य माणसांना द्यायचे सोडून या सरकारने खाजगी कंपन्यांना दिले
३. आयुष्यमान भारत योजनेतील लोकांना ५ लाख रुपये विमा देण्याचे वचन हि खोटे ठरले
४. मुद्रा योजना सुद्धा संपूर्णतः फेल ठरलेली आहे

भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे –
१. भाजप सरकारच्या काळात देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या
२. खते, बी बियाणे, कीटकनाशक यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली
३. कृषी किसान योजनेचे बजेट ६४ टक्क्यांनी कमी केले
४. भाजप सरकारच्या काळात शेतकरी बेहाल, दुःखी आणि असमाधानी आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments