Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आणा; भाजप नको : राजू शेट्टी

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आणा; भाजप नको : राजू शेट्टी

mp raju shetty on shiv sena ncp congress over maharashtra govt formation
पुणे : कुणाचंही सरकार आणा, पण भाजपचं येऊ नये, अशी इच्छा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पुण्यात बोलून दाखवली. पण ज्याचं सरकार येईल, त्यांनी आमचा सातबारा कोरा करावा, असं आवाहनही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. भाजपला वगळून इतर तीन पक्षांनी सत्ता निर्माण करावी. अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष काँग्रेस महाआघाडीतील घटकपक्ष आहे. शेट्टी यांच्या पक्षाने मागची निवडणूक भाजपसोबत लढली होती. काही दिवसांनी राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या मुद्यावर भाजपासून दूर गेले होते. त्यांचे जवळचे साथीदार सदाभाऊ खोत हे देखील त्यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी देखील वेगळी चूल मांडली होती. यानंतर राजू शेट्टी यांचा तेव्हापासून भाजपविरोधी सूर दिसून येतो, तो आजही कायम आहे. त्यामुळे काँग्रेस महाआघाडीतील घटक पक्षही सत्तास्थापनेसाठी उत्सूक असल्याचे दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments