Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मात्र जम्बोब्लॉकमधून सुटका झाली आहे.

उपनगरीय मार्गावरील रुळाखालील खडी बदलणे, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर यांच्या तपासणीसाठी रविवारी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉकची कामे होणार आहेत. डाऊन जलद मार्गावर होणाºया कामांमुळे वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने अपेक्षित आहे. अप आणि डाऊन जलद लोकलना नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. परिणामी, अप दिशेकडील वाहतूक सुमारे १० मिनिटे उशिराने धावणार आहे.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकलची वाहतूक सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष फेºया चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments