Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमराठवाडालातूरअश्वजीत गायकवाड यांनी घेतले शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद

अश्वजीत गायकवाड यांनी घेतले शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद

Ashwajit Gaikwad,Shivling Shivacharya Maharaj,ashwajit,gaikwadउदगीर : वसुंधरारत्न राष्ट्रसंत श्री . ष.ब्र.१०८ डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे ८३ वे श्रावणमास तपोनिष्ठांण व मृत्युंजय व आयुअवर्धन सोहळा उदगीर येथील पांढरे मंगल कार्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
बुधवार दि.३१ जुलै रोजी सकाळी येथील अण्णाभाऊ साठे चौक ते ओम गार्डन मंगल कार्यालय, रिंग रोड मार्गे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पालखीला सुरुवात झाली,यावेळी भाजपा युवा नेते अश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या सह नागनाथ निडवडे, आदी मान्यवर उपस्थित होते, या वेळी पालखी सोहळ्यात आपल्या कार्यकर्त्या सह युवा नेते अश्वजीत गायकवाड यांनी शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेऊन सहभाग नोंदवला. यावेळी उदगीर तालुक्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अश्वजीत गायकवाड यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments