Friday, December 6, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन; प्रत्येक शनिवार – रविवार पूर्ण बंद

औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन; प्रत्येक शनिवार – रविवार पूर्ण बंद

partial-lockdown-in-aurangabad-district-complete-closure-every-saturday-Sunday-news-updates
partial-lockdown-in-aurangabad-district-complete-closure-every-saturday-Sunday-news-updates

औरंगाबाद: मुंबई, पुणे या प्रमुख शहरांपाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाण आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आज औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून लॉकडाउनच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर आज अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला. ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशंत: लॉकडाउन असणरा आहे. तर, प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी हा देखील इशारा दिला की, अंशत: लॉकडाउनच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याशिवाय खासगी व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील सर्वांनी सोबत बाळगणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत राहणार बंद…

तर, या अंशत: लॉकडाउनच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलंतरण तलाव, शाळा-महाविद्यालयं संपूर्ण बंद असतील. विशेषकरून मंगलाकार्यालयं, सभागृह यामध्ये होणाऱ्या विवाह समारंभांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर, शनिवारी व रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय, दूध विक्री, भाजीपाला,फळविक्री सुरू असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments