Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ कोरोना रुग्ण सापडले , ३० मृत्यूंची...

राज्यात २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ कोरोना रुग्ण सापडले , ३० मृत्यूंची नोंद

मुंबई l महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. Maharashtra New covid19 cases तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५८ हजार ८७९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६९ टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रातील मृत्यू दर हा २.६१ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३ लाख ६६ हजार ५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८९ हजार ८०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा l प्रताप सरनाईकांवरील कारवाईवर शरद पवार, म्हणाले…

सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ५ हजार ४३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या ही १७ लाख ८९ हजार ८०० इतकी झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments