Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरेंची महाराष्ट्र भाजपाविरुध्द थेट मोदींकडे तक्रार

उध्दव ठाकरेंची महाराष्ट्र भाजपाविरुध्द थेट मोदींकडे तक्रार

मुंबई l कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजप,मनसे,वंचित आघाडीकडून विविध विषयांवर वारंवार आंदोलने सुरु आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्याकडे तक्रार केली. काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कोरोनाच्या अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत परंतु राजकीय पक्ष आंदोलने करुन जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. असंही उध्दव ठाकरे आठ राज्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी बोलत होते.

हेही वाचा l राज्यात २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ कोरोना रुग्ण सापडले , ३० मृत्यूंची नोंद

लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेनमेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल.

हेही वाचा l राज्यात २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ कोरोना रुग्ण सापडले , ३० मृत्यूंची नोंद

आज दिल्लीत , केरळ मध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत

 पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही करोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व करोना लाटेला आमंत्रण मिळू शकते,” याकडेही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments