मुंबई: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
आज रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मॉल्स रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पाहा काय आहेत मार्गदर्शक सूचना
- सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य
- मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड
- सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य
- पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये
- पाचहून अधिक व्यक्ती एकत्र आल्यास १००० रुपये दंड
- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड
- सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, रात्री ८ ते सकाळी ७ या काळात जाण्यास मनाई
- बार, हॉटेल, सिनेमागृह रात्री ८ ते सकाळी ७ बंद
- गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला
- अंत्यसंस्कारासाठी २० हून अधिक व्यक्तींना परवानगी नाही
- लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच परवानगी
🚨Directions for Containment & Management of COVID-19🚨 pic.twitter.com/n7SNEUw7vN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2021