Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रशासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde on Onion Farmers ‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde Says, “Maharashtra Government is with Onion Farmers.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments