राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, ४ मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर विविध संघटना “धरणे आंदोलन” करणार आहेत. कथित आयआयटी – मुंबई येथी दलित विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) द्वारे व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटना या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आयआयटी – मुंबई येथील B.Tech च्या प्रथम वर्षात शिकणारा १८ वर्षीय विद्यार्थी दर्शन सोलंकी याने ५ फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
याप्रकरणी, पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू ची नोंद केली आहे. तरी, दर्शनच्या पालकांना यामध्ये त्याच्यावर जातीय भेदभाव केला गेला असून हि आत्महत्या त्याचमुळे घडली असल्याचा दावा केला आहे.
“दर्शनने जातीभेदाबाबत तक्रार केली होती, पण कोणीही त्याचे ऐकले नाही,” असा दावा दर्शनचे वडील रमेश सोळंकी यांनी केला आहे.
दरम्यान, आयआयटी-मुंबईने एक निवेदन जारी केले आणि जातीय भेदभावाच्या बातम्यांचे जोरदार खंडन केले.
तसेच, आयआयटी-बॉम्बेच्या संचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.
डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी या समितीच्या चौकशीला विरोध करत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की “आयआयटी-मुंबईच्या संचालकांनी मागासलेल्या समाजातील काही सदस्य घुसवून कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा समावेश असलेली अंतर्गत समिती स्थापन केली.””पण आम्ही या निर्णयावर खूश नाही कारण अंतर्गत समितीला काही अर्थ नाही.””आम्हाला एसआयटीकडून योग्य तपास हवा आहे.”
“याप्रकरणात, मोठ्या प्रमाणात जातीय भेदभावाचा संशय आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे आई-वडील मुंबईला पोहोचण्यापूर्वी त्यांनी दर्शनचे पोस्टमॉर्टम केले. त्यांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या पालकांना दिली नाही. “या सर्व गोष्टींमुळेच संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे,” ते पुढे म्हणाले.
Web Title: IIT-Bombay Student Suicide Case: ex-MP Mungekar demands SIT probe; announces a protest