Friday, May 3, 2024
Homeदेशलूट : रेल्वेदरवाढीने प्रवाशांचे खिसे कापले

लूट : रेल्वेदरवाढीने प्रवाशांचे खिसे कापले

मुंबई : केंद्र सरकारने आजपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीटदरातील वाढ करुन प्रवाशांना दणक दिला. सर्वसाधारण लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा, बिगर वातानुकूलित मेल आणि एक्स्प्रेससाठी प्रतिकिमी दोन पैसे आणि वातानुकूलित प्रवासासाठीची दरवाढ किमीमागे चार पैसे आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

महागाईमुळे जनता हैराण असतांना रेल्वेने तिकीटदरामध्ये वाढ केली आहे.

मेल-एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रति किलोमीटर २ पैसे अधिक मोजावे लागणार आहे. शयनयान आणि प्रथम श्रेणीच्या भाडे शुल्कात प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मेल-एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर ४ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. या दरवाढीनंतर मुंबई-नागपूर तिकीट दरात सर्वसाधारण गाडीसाठी ८ रुपये १६ पैसे, मेल एक्स्प्रेससाठी १६ रुपये ३२ पैसे आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकीटदरात ३२ रुपये ६४ पैशांची वाढ होणार आहे.

मुंबई-मडगाव प्रवासासाठी साधारण गाडीसाठी ५ रुपय ८० पैसे, मेल एक्स्प्रेससाठी ११ रुपये ६० पैसे आणि एसी गाड्यांसाठी २३ रुपये २० पैसे वाढणार आहेत. मुंबई-सोलापूरकरीता प्रवाशांना साधारण गाडीसाठी ४ रुपय ५३ पैसे, मेल एक्स्प्रेससाठी ९ रुपये ६ पैसे आणि एसी गाड्यांसाठी १८ रुपये १२ पैसे जादा मोजावे लागतील. कोल्हापूरसाठीचा प्रवासदेखील महागला आहे. मुंबईहून कोल्हापूरसाठी आजपासून साधारण गाडीला ५ रुपये १६ वाढणार आहेत. मेल एक्स्प्रेससाठी १० रुपये ३२ पैसे आणि एसी गाड्यांसाठी २० रुपये ६४ पैसे वाढणार आहेत. मुंबई- दिल्लीकरीता प्रवाशांना साधारण गाडीसाठी १३ रुपय ८६ पैसे, मेल एक्स्प्रेससाठी २७ रुपये ७२ पैसे आणि एसी गाड्यांसाठी ५७ रुपये ४४ पैसे जादा मोजावे लागतील.

उपनगरी वाहतुकीस या दरवाढीतून वगळण्यात आले आहे. सामान्य बिगर वातानुकूलित प्रवासासाठी ही दरवाढ प्रति किलोमीटर एक पैसा असेल. बिगर वातानुकूलित मेल वा एक्स्प्रेस प्रवासासाठीची दरवाढ प्रतिकिमी दोन पैसे, तर वातानुकूलित प्रवासासाठीची दरवाढ किमीमागे चार पैसे असेल. मात्र, या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments