Tuesday, May 21, 2024
Homeकोंकणठाणेदिवा, मुंब्रा, कळवा भागातील पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत: 15 हजारांचे अर्थसाह्य

दिवा, मुंब्रा, कळवा भागातील पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत: 15 हजारांचे अर्थसाह्य

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केले तातडीचे अर्थसाह्य

ठाणे (प्रतिनिधी): मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दिवा, मुंब्रा, कळवा येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना दिल्या जाणार्‍या अर्थसाह्यामध्ये हयगई केली जात होती. ही बाब ध्यानात आल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी 40 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 15 हजार रुपयांचे तत्काळ वाटप करण्याचे आदेश दिले.

मागील आठवड्यामध्ये दिवा, मुंब्रा, कळवा आदी भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये अनेकांच्या संसारांची धुळधाण उडाली आहे. अनेकांच्या घरामध्ये एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. या उद्ध्वस्त झालेले संसार उभे करावे; पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी योग नियोजन करावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, हेमथ टकले, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी आव्हाड यांनी, दिवा, मुंब्रा, कळवा येथील पूरग्रस्तांना तत्काळ अर्थसाह्य देण्याची आग्रही मागणी केली. तसेच, पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 40 हजार रुपये तत्काळ देण्यात यावेत; त्यांच्या बँक खात्यात ते जमा करण्यापेक्षा रोखीने ही रक्कम द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 15 हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येईल असे जाहीर केले. तसेच, संबधितांना त्या संदर्भातील आदेशही दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments