Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणशासनाने शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाची मर्यादा वाढवून द्यावी महापौर मिनाक्षी शिंदे करणार मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार

शासनाने शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाची मर्यादा वाढवून द्यावी महापौर मिनाक्षी शिंदे करणार मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार

ठाणे, ता. 21 ः महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांना शिधावाटप दुकानातून रॉकेल व इतर धान्य मिळण्यासाठी त्यांचे कौटुंबिक उत्पन्नानुसार पिवळी, केशरी व शुभ्र शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात आली व यासाठीनिश्चित केलेली उत्पन्नमर्यादा गेल्या 20 वर्षापूर्वीच्या उत्पन्नावर आधारित आहे. मात्र या उत्पन्नाच्या मर्यादेत गेल्या 20 वर्षापासून कोणताही बदल झाला नसून उत्पन्नाची मर्यादा वाढवावी जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांना त्याचाफायदा होईल यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी आज दिली.

शिधावाटप दुकानात धान्य घेण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याबाबतचे पत्र नुकतेच महापौर यांनी शिधावाटप अधिका-यांना दिले होते, या पार्श्वभूमीवर आज शिधावाटप अधिकारी राजू पळसकर व शिधावाटप निरीक्षकवासुदेव पवार यांनी महापौरांची भेट घेतली. गेल्या 20 वर्षापासून शिधापत्रिकाधारकांची उत्पन्नाची मर्यादा एकच ठेवण्यात आली आहे, उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याची चर्चा महापौरमिनाक्षी शिंदे यांनी यावेळी केली.

 1998 पासून शासनाने शिधापत्रिकाधारकांची उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. 15 हजारापर्यत उत्पन्न असणाऱया शिधापत्रिकाधारकांना पिवळी, 15001 ते 1 लाख उत्पन्न असणाऱयांना केशरी शिधापत्रिका, 1लाखांच्यावर उत्पन्न असणाऱयांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येत आहे. या मर्यादेमध्ये वाढ करुन 3 लाखांपर्यत उत्पन्न असणाऱया शिधापत्रिकाधारकांना पिवळी, 3 ते 5 लाख उत्पन्न असणाऱयांना केशरी व 5 लाखांच्यावर उत्पन्नअसणाऱयांना शुभ्र शिधापत्रिका दिल्यास नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. लोकप्रतिनिधी म्हणून समाजात काम करीत असताना प्रभागातील नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ओळखपत्र द्यावे लागते, यासाठीशिधापत्रिका हा एकच पुरावा ग्राह्य धरला जातो. परंतु नागरिक आपले कौटुंबिक उत्पन्न सांगत नाही, त्यामुळे या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ केल्यास नागरिकांना याचा फायदा होईलच व नागरिकाचे मूळ उत्पन्न देखील समोर येण्यासमदत होईल.

    गेल्या 20 वर्षापासून शासनाने ठरवून दिलेले उत्पन्नच शिधापत्रिकासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे, या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महापौर यांनी यावेळी दिली. जेणेकरुनसर्वसामान्य नागरिकांना येत्या काही काळातच दिलासा मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments