Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeकोंकणठाणेमहाराष्ट्र महोत्सवांतर्गत "चव महाराष्ट्राची" या आगळया वेगळया कार्यक्रमास ठाणेकरांचा प्रचंड प्रतिसाद.

महाराष्ट्र महोत्सवांतर्गत “चव महाराष्ट्राची” या आगळया वेगळया कार्यक्रमास ठाणेकरांचा प्रचंड प्रतिसाद.

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व ठामपाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिनांक 23 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 या कालावधीत सायं.04.00 ते 10.00 वा.चे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळीनाका, ठाणे येथे महाराष्ट्र महोत्सवांतर्गत  “चव महाराष्ट्राची” या आगळया वेगळया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

रविवार, दिनांक 27.1.2019 हा सुट्टीचा दिवस असल्याने या महोत्सवास मोठया प्रमाणात नागरीकांनी प्रतिसाद देऊन अनेक खवैय्यांनी महाराष्ट्रातील विविध पदार्थांचा अस्वाद घेतला व या आगळया वेगळया महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल ठा.म.पा.  सभागृह नेते – नरेश म्हस्के यांचे कौतुक केले.

ठाण्यातील अभिनय कट्टयातील अनेक नवोदित कलाकारांनी हिंदी व मराठी गाणी सादर करुन आपली कला सादर केली. युक्ती फौंडेशनतर्फे ठाणे महानगरपालिकेतर्फे बेघरांना निवारा उपलब्ध करुन देण्यात येतो या महत्वपूर्ण विषयावर समाज प्रबोधनात्मक पथनाटय सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळविली. मेघ म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने कंपोज केलेलं स्वत:चं गाणं सादर करुन महोत्सवाची रंगत वाढविली. तर ब्राम्हाण विदयालयाच्या विदयार्थ्यांनी आपली कला सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळविली.

          महाराष्ट्राची चव या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील खादयपदार्थ, लाकडी खेळणी, मसाले, विविध जिवनावश्यक पदार्थ, नऊवारी साडी पासून पैठणीपर्यंत आणि विविध ड्रेस मटेरियल, गोधडी, दागिने, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापूरी चपला, वारली पेंटींग आणि वस्तू, हातमागावर तयार केलेल्या घोंगडया, ब्ल्ँकेट, मातीची भांडी इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत याचा आर्वजून उल्लेख करुन दिनाक 30.1.2019 पर्यंत आयोजित या महोत्सवास भेट दयावी असेही यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी जाहीर आवाहन केले.

          महाराष्ट्र महोत्सवामध्ये पाच प्रांतातील खांदेशी कोळी, आगरी पध्दतीने बनवलेले मांसाहारी पदार्थ, मडक्यातील चिकन, मटन बिर्याणीचे विविध पदार्थ, मालवणी पध्दतीचे जेवण, मराठवाडयातील जेवण असे विविध पदार्थ उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, विदर्भातील सावजीचे मटन, नागपुरी भात, पुणेरी मिसळ, आळूवडी, पुरणपोळी, खांदेशी मांडे इत्यादी विविध पारंपारीक पदार्थांबरोबरच कोकणातील मालवणी पदार्थांचा आस्वाद समस्त ठाणेकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

           उपरोक्त महोत्सवामध्ये खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उप महापौर रमाकांत मढवी, शिक्षण समितीचे सभापती विकास रेपाळे, नगरसेवक नरेश मणेरा, सुहास देसाई, नगरसेविका अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, पद्मा भगत, निशा पाटील, शर्मिला गायकवाड, स्नेहा आंब्रे आदी मान्यवरांनी भेट देऊन विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.

तसेच या आगळयावेगळया महोत्सवास वेळातवेळ काढून सुप्रसिध्द सिनेकालाकार/दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेकलाकार सुबोध भावे, संदीप कुलकर्णी, मंगेश कदम, निना भागवत, सुप्रिया पाठारे, सायली पाटील, आरोह वेलिंगकर आदी मान्यवरांनी भेट देऊन सभागृह नेते-आयोजक नरेश म्हस्के व क्रीएटीव्ह हूकच्या संचालिका रंजना प्रभूखानोलकर आणि सर्व टिमचे कौतुक 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments