Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeकोंकणपालघरबंड : शिवसैनिकांचा विलास तरे यांच्या उमेदवारीला विरोध

बंड : शिवसैनिकांचा विलास तरे यांच्या उमेदवारीला विरोध

Vilas Tare Shiv Sena,Vilas Tare,Shiv Sena,Shiv,Sena,Vila,Tareपालघर : काही दिवासांपूर्वी आमदार विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, आयात आमदार विलास तरे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखेच्या पदाधिका-यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. अन्यथा  विरोधात काम करू असा इशारा दिला आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांना शिवसेनेने बोईसर विधानसभेसाठी आयात उमेदवार केल्याने शिवसेनेत मोठा कलह आहे. विलास तरे यांच्या उमेदवारीला बोईसर विधानसभेतील निष्ठावान शिवसैनिकांचा विरोध होत आहे. स्थानिक उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी मिळावी. आयात उमेदवार नको अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी शिट्टी सोडून धनुष्यबाण हातात घेतला. पण त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली आहेत. त्यामुळे शिवसेनेते उमेदवारी जाहीर होण्याआधीच गोंधळ उडाला आहे.

तरे हे गेले दोन टर्म बोईसर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीतून त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. 2009 ला ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र आता बहुजन विकास आघाडी सोडत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुन्हा ते उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments