कोल्हापूर: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने बुधवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या. कन्हैय्याकुमारने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. विचारवंतांचा आवाज दडपण्याचा हिंदुत्ववादी प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी त्याने केला.
चार विचारवंतांची हत्या झाल्या आहेत, त्यातील एकाही खूनातील आरोपी सापडेले नाहीत, हे दुर्देवी आहे. पानसरे खून खटल्यातील एक संशयित सापडलेला असताना त्यालाही पोलिसांनी सोडून दिले आहे. देश महासत्ता बनविण्याची भाषा बोलणाऱ्यांना या विचारवंतांच्या हत्या करणाऱ्या एकही आरोपी सापडत नाही, हे कशाचे लक्षण आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, परंतु त्या मूर्ख लोकांना कळत नाही, की जितका आवाज दाबला जाईल, तितक्या तीव्रतेने तो पुन्हा उभारणार आहे. दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने मुक्त सैनिक वसाहत येथे बुधवारी सकाळी एक घर – एक पुस्तक अभियानातून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या क्रांतीज्योती साऊ – राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयांच्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी भालचंद्र कागो, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे राज्य अध्यक्ष पंकज चव्हाण, सेक्रेटरी सागर दुर्योधन, माजी राष्ट्रीय सेक्रेटरी अभय टाक साळकर, माजी राज्य सेक्रेटरी फिडेल चव्हाण, शहर सचिव आरती रेडेकर यांची उपस्थिती होती. एक घर – एक पुस्तक अभियानाची सुरुवात उमाताई पानसरे यांच्या हस्ते पुस्तक घेऊन झाली. काही महिन्यातच अनेकांनी योगदान दिल्याने सुमारे पंधरा हजार पुस्तके जमा झाली आहेत. याच चळवळीतून हे पहिले वाचनालय सुरु होत आहे. आता जिल्हयात लवकरच दहा ठिकाणी अशा प्रकाराची वाचनालय सुरु होणार आहेत. याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, जिल्हा सचिव अनिल चव्हाण, सतिशचंद्र कांबळे, रघू कांबळे, पांडुरंग रेडेकर, एक घर एक पुस्तक अभियानाचे जिल्हा समन्वयक प्रशांत आंबी, जिल्हा कौन्सिल सदस्य कृष्णा पानसे, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष धिरज कठारे, सदस्य संदेश माने, यशराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट
RELATED ARTICLES