मुंबई : ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा आहे. परंतु या चित्रपटात चुकीच्या गोष्टी घूसडल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. ट्विटवरुन या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली.
ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल, असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल.#TanhajiTrailer @omraut— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 20, 2019