Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजी भिडे, बुध्द समजायला बुध्दी लागते ; आव्हाडांचा टोला

संभाजी भिडे, बुध्द समजायला बुध्दी लागते ; आव्हाडांचा टोला

Sambhaji Bhide jitendra awhad
पंतप्रधानांच्या बुध्दाच्या वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधानं केले. या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडे यांना जोरदार टोला लगावला. बुध्द समजायला बुध्दी लागते असे आव्हाड म्हणाले.

बुद्ध समजायला बुद्धी लागते. कोणालाही बुद्ध समजत नाही. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की भिडेंचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करावा. असाही टोला लगावला. समता आणि बंधुत्वाची जगाला पहिल्यांदा ओळख करून देणारा महामानव कोण तर ते गौतम बुद्ध होते. दुर्दैवाने महाराष्ट्रात गोडसेंनंतर भिडे जन्माला आले आहे, असा घणाघात आव्हाडांनी केला. तुम्ही जर बुद्धाला कमी लेखणार असाल तर तुमची जगमान्यता निघून गेल्याशिवाय राहणार नाही, अशी भितीही आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली.

भिडेंच्या या वक्तव्यावरून त्यांचा जोरदार समाचार घेतला जात आहे. भिडे अधून मधून वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments