Thursday, September 12, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमहापालिकेत भाजपा,काँग्रेस राष्ट्रवादीच नगरसेवक भिडले

महापालिकेत भाजपा,काँग्रेस राष्ट्रवादीच नगरसेवक भिडले

पुणे: मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदाइसाठी परवानगी देण्यावरून महापालिका सभेत गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपा व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकमेकांसमोर आले. राष्ट्रवादीच्या महेंद्र पठारे यांनी भाजपाच्या गुंडांच्या उपस्थितीत खोदाई होते असा आरोप केला. त्यामुळे भाजपाचे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावले. भाजपाचे दीपक पोटे यांनी काही गैरशब्द काढले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी सभाग्रहात घोषणाबाजी सुरू केली. महापौर मुक्ता टिळक यांनी गैरशब्द कामकाजातून वगळण्याचा आदेश दिल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments