Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादमी लिंगायत….माझा धर्म लिंगायत’; स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी मोर्चा!

मी लिंगायत….माझा धर्म लिंगायत’; स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी मोर्चा!

lingayatमहत्वाचे…
१. लिंगायत धर्माला मान्यता मिळावी यासाठी मोर्चा काढण्यात आला
२. लिंगायत समाजाच्या मोर्चाला मराठा सेवा संघाचा पाठिंबा
३. अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व सवलती मिळाव्यात


औरंगाबाद: मी लिंगायत….माझा धर्म लिंगायत’, ‘एक लिंगायत कोटी लिंगायत’, ‘भारत देशा जय बसवेशा’, आशा घोषणांचे फलक हातात घेऊन लिंगायत धर्माला मान्‍यता मिळावी या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे औरंगाबादमध्ये रविवारी मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चाला मराठा सेवा संघानेही पाठिंबा दिला होता. शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि माते महादेवी बेंग लुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.

हजारोंच्या संख्येने लिंगायत समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. सामाजिक समस्या आहेत. इतर धर्मांप्रमाणे लिंगायतांची विशिष्ट संस्कृती, आचरण पद्धती आहे. परंतू लिंगायत धर्माची शासकीय मान्यता हिरावून घेतल्याने सवलती मिळत नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सर्व सवलती मिळाव्या यासाठी हा लढा उभारला असल्याचे मोर्चेकर्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments