Friday, June 21, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबादेतील ‘गॅस्ट्रोची छावणी’ शंभर टक्के बंद!

औरंगाबादेतील ‘गॅस्ट्रोची छावणी’ शंभर टक्के बंद!

महत्वाचे…
१.बंद मध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी २.सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्णतेने दिला पाठिंबा ३.दूषित पाणी प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी


औरंगाबाद: शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रकामुळे अखेर नागरिकांनी शुक्रवारी छावणी परिसरातील आपले सर्व छोटे मोठे व्यवहार बंद ठेवून छावणी परिषदेचा निषेध नोंदवला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

छावणीतील सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार बालन नायर यांना निवेदन दिले. यावेळी शेख कासीम,मयांक पांडे,हबीब पाशा,शेख बशीर,ओमकार सिंह,शेख फिरोज,निलेश धारकर,विजय चौधरी,यांच्यासह शेकाडो नागरिकांची उपस्थिती होती. गेल्या आठ दिवसापासून छावणीकरांना दूषीत पाण्याने आपल्या जाळ्यात ओढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांना गॅस्ट्रोची लागन झाली होती. या धक्यातून नागरिक अजूनही बाहेर पडले नाही. पाणीपुरवठ्या बाबत दररोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नुकतेच पुणे येथील राज्य आयोग्य प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ.एस.एम.बाकरे यांनी छावणीतील जलकुंभांना भेटी देऊन पाहणी केली असता जलकुंभ डिसेंबर २०१५ नंतर स्वच्छ केले नसल्याचे आढळले होते. तसेच पाण्याचे सर्व नमुने तपासले असता दूषीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला होता. राज्यभरात याची गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद्भवू नये, उद्भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे. छावणीतील गॅस्ट्रोच्या परिस्थितीचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने राज्य पातळीवर कळविला आहे.

छावणी परिसरात १० नोव्हेंबरपासून एकाच वेळी अनेकांना अतिसार, पोटदुखी, उलटी असा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या पाहता पाहता चार हजारांवर पोहोचल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. विभागीय स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाला या भागात पाचारण करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी नऊशेवर घरांना भेट देण्यात आली. हा उद्रेक गॅस्ट्रोएनट्रायटिसचा असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात प्रथमच इतक्या संख्येने गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. २७ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

छावणी परिषद असो की, आरोग्य विभाग या सगळ्या विभागातील अधिकारी या गंभीर परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेतील या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. इतर ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये,यासाठी जलव्यवस्थापनाबरोबर आरोग्य विभागाने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गॅस्ट्रोच्या प्रकरणाची राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये नोंद झाली आहे, अशा परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा धडा घेणार असल्याचे दिसते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments