Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रसोनिया गांधींची शिवसेनेच्या चार खासदारांनी घेतली भेट

सोनिया गांधींची शिवसेनेच्या चार खासदारांनी घेतली भेट

uddhav sonia congress shivsenaमुंबई : राज्यात सत्तास्थापनेचे पेच कायम आहे. मंगळवारी सर्वेाच्च न्यायालयात त्यावर सुनवाई होणार आहे. या घडामोडी घडत असताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत,राहुल शेवाळे, अनिल देसाई, गजानन किर्तीकर यांनी आज सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी राज्यात सत्तास्थापन करणार आहेत. मात्र त्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी गुपचूप सरकार स्थापन केलं. त्यामुळे महाआघाडीच्या नेत्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या चारही खासदारांनी राज्यातील परिस्थितीवर सोनिया गांधीशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
आज काँग्रेसच्या वतीने दिल्लीत संसद परिसरात सोनिया गांधीच्या नेतृ्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments