कल्याण: कल्याण-भिवंडी बायपसजवळ एका फर्निचर कंपनीला भीषण आग लागली. पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेली ही आग धुमसत असून, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हिंदवेअर नावाची ही क्रॉकरी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवानांनी आग आटोक्यात आणली.या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहेत.