Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीच्या काळात फडणवीस सरकारची हेरगिरी : गृहमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या काळात फडणवीस सरकारची हेरगिरी : गृहमंत्री

After the result, the Shiv Sena will enter the Congress Alliance Says Anil Deshmukhमुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅपींग करण्यात आले. इजराईलहून सॉफ्टवेअर मागवण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, महाराष्ट्र सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅपींग करण्यात आले. फोन टॅपींगसाठी इजराईलला अधिका-यांना पाठवून सॉफ्टवेअर मागवण्यात आले होते. असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या फोन टॅपींग करण्यात आले आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, तुमचे फोन टॅप होत आहेत, अशी माहिती एका भाजपाच्याच मंत्र्यानं दिली असा दावा संजय राऊत यांनी केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात काही जणांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. या चर्चांदरम्यानच संजय राऊत यांनी ट्विटरवरून हा दावा केला आहे.

“तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments