Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशनोकरदारांना दणका, पीएफवरील व्याजदरात कपात

नोकरदारांना दणका, पीएफवरील व्याजदरात कपात

नवी दिल्ली: नोकरदार वर्गासाठी एक वाईट बातमी आहे. पीएफवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ईपीएफओने पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांहून ८.५५ टक्क्यांवर आणला आहे. याची झळ नोकरदारांना बसणार आहे. यामुळे नोकरदरांच्या रोषाला सरकारला पुन्हा सामोरे जावे लागणार आहे.

केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफवरील व्याजदर कमी करून तो ८.५५ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, याला ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली असून पीएफ अकाऊंटच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे.
पीएफवरील व्याजाचा दर २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के एवढा होता. मात्र, यानंतर ईपीएफओने २०१६-१७ मध्ये हा व्याजदर कमी करून ८.६५ टक्क्यांवर आणला. तर आता हा व्याजदर ८.५५ टक्के केला आहे. पीएफचा व्याजदर कमी करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments