Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर प्रदीप शर्मांनीं सेनेचा भगवा घेतला हातात

अखेर प्रदीप शर्मांनीं सेनेचा भगवा घेतला हातात

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी पोलीस खात्याला रामराम ठोकला. हातातली पिस्तूल सोडून आज मातोश्रीवर शिवबंधन बांधले. शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शर्मा म्हणाले की, उद्धव ठाकरे जी कामगिरी देतील ती पार पाडेन असं म्हटलं आहे. तसेच माझ्या पडत्या काळात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप मदत केल्याचं सांगत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही जे एन्काउंटर स्पेशालिस्ट होतो, त्या आम्हा सर्वांना बोलावून आमच्या अडीअडचणी जाणून आमच्या पाठीवर हात फिरवत पाठबळ दिलं. माझ्या उतरत्या काळात मला त्यांनी खूप मदत केली. शिवसेनेला आणि बाळासाहेबांना मी कधीच विसरणार नाही.

मला नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मी ती मोहीम फत्ते पाडेन असं ठाकूर यांना थेट आव्हान देखील प्रदीप शर्मा यांनी नाव न घेता दिलं आहे. मी निलंबित असताना मला शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली. माझे निलंबन केले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी धाडसाची धिंड या मथळ्याखाली अग्रलेख लिहला होता. अजूनही माझ्याकडे तो अग्रलेख आहे. ३६ वर्ष पोलीस खात्यात काम केले. आता सोडताना खूप दुःख होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments