Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

बँकेतील गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कधीच नव्हते हे मी जबाबदारीने सांगू शकतो

Eknath Khadse Criticize on own government

मुंबई: राज्य शिखर बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाणुनबुजून ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

मात्र, आता भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमुळे शंका उपस्थितीत होत आहे.

खडसे म्हणाले की. मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली.

सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्याने अशी शंका उपस्थित केल्याने विरोधकांच्या दाव्याला बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधक आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार यांनीही स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आगामी काळात निवडणुकीसाठी मुंबईबाहेर असल्याने मी स्वत:हून २७ सप्टेंबरला ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार आहे. त्यांचा काही पाहुणचार असेल तर तोही घेईन, असे पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments