Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ दाभोळकर हत्या प्रकरण: हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांचा हायकोर्टाने मागितला चौकशी अहवाल!

डॉ दाभोळकर हत्या प्रकरण: हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांचा हायकोर्टाने मागितला चौकशी अहवाल!

मुंबई:  मुंबई उच्च न्यायालयाने दाभोळकर हत्या प्रकरणी महत्त्वाचा आदेश दिला आहे.  डॉ नरेंद्र दाभोलकर खून तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करावा असे सीबीआय आणि महाराष्ट्र शासनाला निर्देश दिले आहे.

२० ऑगस्ट २०१३ साली दाभोळकरांची  पुण्यात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गोष्टीला आज ४ वर्ष उलटून गेली तरी अजूनही दाभोळकरांचे मारेकरी पकडले गेलेले नाहीत. काही संशयितांना अटक करण्यात आली होती पण त्यांना पुराव्यांच्या अभावी सोडून देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावर आता हायकोर्टाने निर्देश दिले आहे, दाभोळकरांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी  निष्काळजीपणा केला आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्या चौकशीचे अहवाल सादर करा असं हाय कोर्टाने सांगितलं आहे. या प्रकरणी  पोलिसांनी अनेक कच्चे दुवे सोडले  आहेत. त्यामुळेच अजूनही आरोपी पकडले जाऊ शकले नाहीत. तसंच या निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा द्यावी असंही हायकोर्टाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता तरी  दाभोळकरांचे खूनी आता तरी सापडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments