Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरेंना राजकारण कळतं का?- नारायण राणे

उध्दव ठाकरेंना राजकारण कळतं का?- नारायण राणे

कोल्हापूर: कोल्हापूरात शिवसेनेचे शून्य आमदार करायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना राजकारण कळतं का? असा टोला स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी कोल्हापूरात लावला. पुढे बोलतांना ते म्हणाले की,लोकांना काम करणारा नेता हवा आहे त्यामुळे माझ्या पक्षात येण्यास अनेकजण इच्छूक आहेत. नाना पटोले यांनी कुठे जाव,काय करावे त्याचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. मी एनडीएमध्ये असल्याने भाजपाला माझा पाठिंबा आहे.

नारायण राणे हे आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, नाना पटोले हे पूर्वीपासूनच भाजपावर नाराज होते. तसेच विधानपरिषद पोटनिवडणुकीत आघाडीचे मतं फुटल्याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितल की,मत फुटणारच होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आपला राग व्यक्त केला. भाजपशी पटले नाही म्हणून पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंकडून शिवसेनेने स्वाभिमान शिकावा, असा उपरोधिक सल्ला राणे यांनी दिला. सत्ता सोडू आणि सरकारमधून बाहेर पडू असे म्हणायचे, खिशात राजीनामे असल्याचे इशारे द्यायचे आणि सतत सरकारसमोर नाक घासत राहायचे. वारंवार नाक घासल्याने आता शिवसेनेला नाकच राहिलेले नाही, अशीही टीका राणे यांनी केली. ‘माझ्या वाघांनो’ असे उद्धव ठाकरे हे त्यांच्या सभेत कायम म्हणतात. त्यांनी जंगलात जाऊन कधी वाघ पाहिला आहे का? नुसती डरकाळी फोडल्याने काहीही होत नाही. पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री फक्त टीका करायची म्हणून त्यांच्यावर उद्धव ठाकरे टीका करत आहेत, नशीब अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर बोलत नाहीत असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. ‘द्या आणि घ्या’ (गिव्ह अँड टेक) या मुद्द्यावर आपण भाजपशी जोडले गेलो आहोत. भाजपने देण्यासाठी काही कालवाधी घेतला असावा असे म्हणत त्यांनी भाजपसंबंधीचा प्रश्न टाळला. तसेच काँग्रेस सोडल्यावरही राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्यावर टीका करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना सोडल्यावरही आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कधीही टीका केली नाही असेही राणे यांनी स्पष्ट केले. मात्र काँग्रेसच्या विरोधातील विचारांची धार कायम राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. नितेशचे नुकसान का करू? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नितेश राणे काँग्रेसचा आमदार आहे. वेळ आल्यावर त्याबाबत निर्णय घेऊ तूर्तास त्याचे नुकसान करणार नाही असेही राणे यांनी पत्रकारांना सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments