Placeholder canvas
Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपा कार्यकर्त्यांना गाजर दाखवत आहे;अजित पवारांनी साधला निशाणा

भाजपा कार्यकर्त्यांना गाजर दाखवत आहे;अजित पवारांनी साधला निशाणा

नांदेड l भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. पक्ष सोडून जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना भाजपा गाजर दाखवत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrkant patil हे तर बावचळले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आलेल्या अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.

वाचा l Vivo Y1s भारतात लाँच, किंमत फक्त 7,990 रुपये

भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार पडेल असं म्हणत आहेत. गाजर दाखवण्याचं काम सुरु आहे तरीही एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे एकमेव धोरण आहे. आजवर महाराष्ट्र अजित पवार यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं.

वाचा l तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केलं. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करण्याची आवश्यकता नाही. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments