Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रविधानपरिषद पोटनिवडणुकीबाबत आज मुंबईत निर्णय - अशोक चव्हाण

विधानपरिषद पोटनिवडणुकीबाबत आज मुंबईत निर्णय – अशोक चव्हाण

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर आम्ही देण्याचे कारण नाही. त्यांनी निर्णय घेतला, आता त्यांचे भवितव्य त्यांनीच घडवावे. विधानपरिषद पोटनिवडणुकीत आमचे संख्याबळ कमी आहे. तथापि, रविवारी याबाबत मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होऊन रणणिती ठरवू अशी माहिती काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत विधानपरिषद पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस उमदेवाराबाबत शिक्कामोर्तब करणार आहे. समविचारी पक्षांना सोबत घेऊन येत्या १२ डिसेंबरला नागपुरात महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचे नेतृत्त्व खासदार राहुल गांधी व राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार करणार आहेत, अशी माहिती कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी दिली.  समृद्धी महामार्गाला बाहेर विरोध करायचा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाठिंबा द्यायचा, असे शिवसेनेचे धोरण असते. त्यांची भूमिका दुटप्पी आहे. विधानपरिषद पोटनिवडणुकीत सरकारच्या बाजूने की विरोधात भूमिका घ्यायची, याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे, असे चव्हाण म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments