Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रराजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल : शरद पवार

राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल : शरद पवार

महत्वाचे…

  • नक्की किती जागा मिळतील आणि सरकार बनेल की नाही, याबाबत आत्ताच भाष्य करता येणार नाही
  • आगामी निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी अन्य पक्षांनी एकत्र येणे गरजेचे
  • काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व कायम

सातारा: भाजपाच्या गेल्या चार वर्षातला कारभार पाहता जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील २०१९च्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलण्यास सध्या अनुकूल वातावरण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र, नक्की किती जागा मिळतील आणि सरकार बनेल की नाही, याबाबत आत्ताच भाष्य करता येणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज ५९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त शरद पवार साताऱ्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, आगामी निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी अन्य पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत नुकतीच भेट झाली होती. मात्र यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नव्हता. त्यामुळे या भेटीबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, राज्यासह केंद्रात काँग्रेससोबत एकत्र काम करण्याची इच्छा आहे. काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व कायम आहे, ते आपण मान्य केले पाहिजे.

गेल्या युपीए सरकारमध्ये शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी स्थापलेल्या कृषी संशोधन केंद्रांच्या स्थितीबाबत प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले, संस्था बंद करण्याचा भाजपाचा घाट असल्याचे आपल्याला वाटत नाही. मात्र, भाजपा सरकार येथील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरत नाहीए. यातील बऱ्याच संस्थांना प्रमुख नाहीत. निवडणूक आयोगाच्या भुमिकेबाबत बोलताना पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीत लोकांच्या मनातील संशय दूर करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. हे काम त्यांनी चोखपणे केले तरच ते लोकशाहीच्या हिताचे असेल.

राज्यात कालच सर्वत्र मराठीचा वापर करण्याबाबतचा सरकारने परिपत्रक काढले. मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सरकार हालचाली करीत नसल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत आणि धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत सरकार गंभीर नाही, त्यांची निवडणुकतील आश्वासने हवेतच विरली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments