Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना : नोटा छपाईचा कारखाना बंद!

कोरोना : नोटा छपाईचा कारखाना बंद!

नाशिक : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये असलेला नोटांचा कारखानाही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. करन्सी प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा कारखाना देशात असलेल्या नोटांच्या चार छापाई कारखान्यांपैकी एक आहे. तिथे नोटा, नाणी आणी मुद्रांक निर्मिती केली जाते.

या चार ठिकाणी होते नोटांची छपाई…

देशात चार ठिकाणी नोटांच्या छापाईच्या प्रेस आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, मध्यप्रदेशात देवास, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी आणि कर्नाटकात म्हैसूर या ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. नाशिकमध्ये दर दिवशी पाच दशलक्ष नोटांची छपाई होते. नंतर देशभरात या नोटा वितरीत केल्या जातात. या नोटांच्या छपाईसाठी परदेशातून शाई मागवावी लागते.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहिली तर आपल्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच आता गावा-गावाला जोडणारी एसटी बस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते 31 मार्चपर्यंत राज्य परिवहनची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक ठप्प होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments