Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात २४ तासांत १४ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित; ५७ मृत्यू!

राज्यात २४ तासांत १४ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित; ५७ मृत्यू!

corona-update-covid-patients-in-maharashtra-todays-death-count
corona-update-covid-patients-in-maharashtra-todays-death-count

मुंबई: राज्यातल्या दिवसभरातल्या कोरोना आकडेवारीमुळे कोरोनाचं उग्र रुप समोर आलं आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात तब्बल १४ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तसेच, ५७ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे.

गेल्या २४ तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे. त्यापैकी १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ९२.९४ टक्के इतका आहे.

पण दुसरीकडे सातत्याने वाढणारी बाधितांची संख्या चिंतेत भर टाकू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, गुरुवारच्या ५७ मृत्यूंसोबत आता राज्यातल्या मृतांचा आकडा देखील वाढून ५२ हजार ६६७ इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर २.३२ टक्के इतका आहे.

मुंबईतल्या आकडेवारीचा विचार करता आज दिवसभरात मुंबईत १ हजार ५०९ नवे कोरोनाबाधित सापडले असून एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ३८ हजार ६४३ च्या घरात गेला आहे. तर दिवसभरात झालेल्या ४ मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ११ हजार ५१९ वर गेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments