Friday, May 17, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड

कोल्हापूर: शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापौर म्हणून निवड झाली आहे. कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांचा ११ मतांनी पराभव केला आहे. शोभा बोंद्रे यांना ४४ मतं मिळाली तर रुपाराणी निकम यांना ३३ मतं मिळवता आली.

शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आणि मतदानात सहभाग न घेतल्यामुळे कॉंग्रेसच्या विजयाच्या वाटा मोकळ्या झाल्या असे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments