Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची रात्री घेणार भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची रात्री घेणार भेट

Uddhav Thackeray , Narendra Modiमुंबई : महाराष्ट्रातील सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होणार आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर हे दोन्ही नेते प्रथमच एकमेकांना भेटत असून या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी ६ डिसेंबर रात्री १० वाजता पुण्यात दाखल होणार आहेत. राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर स्वागत करण्यासाठी जाणार आहेत. मुंबई येथून विमानाने निघून रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे पुणे विमानत‌‌ळावर दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे विमानत‌ळावर स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री लगेचच रात्री १० वाजून १० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार आहेत. शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्षानंतरची पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव यांची ही पहिलीच भेट ठरणार आहे. त्यामुळे या भेटीबाबत सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.

या भेटीदरम्यान शेतक-यांच्या मदतीसाठी चर्चा होण्याची शक्यता…

ओल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतक-यांच्या आर्थिक मदतीसाठी निधीची गरज आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पंतप्रधानांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments