Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रछोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेची रिपाईतून हकालपट्टी

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेची रिपाईतून हकालपट्टी

Chhota Rajan's brother Deepak Nikalje expelled from RPI
रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची रिपाईतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार झाली.

विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेपत रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी निकाळजे यांच्यावर कारवाई केली आहे.

दीपक निकाळजे यांना महायुतीच्या कोट्यातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर निकाळजेंची तिकीट परत घेण्यात आली होती. त्यामुळे निकाळजे हे पक्षामध्ये अस्वस्थ होते. अशीही चर्चा सुरु होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments