Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र'जावयासारखे राहा, घरजावई का होताय?' चंद्रकांत पाटलांना सोशल मीडियावर सवाल

‘जावयासारखे राहा, घरजावई का होताय?’ चंद्रकांत पाटलांना सोशल मीडियावर सवाल

 Chandrakant Patil trolled on social media
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सेफ मतदारसंघ म्हणून कोथरूडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर समाजमाध्यमांतून टीकेचा सूर उमट आहे. ‘जावयासारखे राहा, घरजावई का होताय?’, असा सवाल चंद्रकांत पाटलांना सोशल मीडियावर विचारला जात आहे. ‘कोथरूडमध्ये मागच्या दाराने प्रवेश‘ , ‘आयत्या कोथरुडात कोल्हापूरचा चांदोबा’ असे खास पुणेरी चिमटे समाजमाध्यमांतून काढले जात आहेत.

आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यावरून वाद आणि चर्चा रंगली होती. याच वेळी समाजमाध्यमांतून उपहासात्मक भाष्यही केले जात आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅतप अशा विविध समाजमाध्यमांमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावरील विनोद फिरत आहेत.

चंद्रकांत पाटलांना सोशल मीडियावर विचारलेले सवाल

‘दादा तुम्ही फक्त डेक्कनपासून डहाणूकर कॉलनीपर्यंत रस्ता न विचारता येऊन दाखवावे, मग आम्ही समजू तुम्ही पुणेकर!’

‘कधीही पराभव पाहिला नाही असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना बारामतीमधून लढण्यास काय हरकत होती?’

‘उमेदवार हा स्थानिक असावा, पुरात वाहून आलेला नसावा’

‘जावई आहात तर जावयासारखे राहा, घरजावई का होताय?’

‘पुणे आताच का आठवलं?’ अशा पद्धतीने टिपण्या समाजमाध्यमांतून करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments