Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसोलापूरात बंदला हिंसक वळण!

सोलापूरात बंदला हिंसक वळण!

महत्वाचे…
१.विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली २.शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना ३. – सोलापूर- बाजार समितीचा बंदला पाठिंबा – सोलापुरात सिद्धेश्वर मंदिरात लिंगायत समाजातील महिला आल्या एकत्र


सोलापूर : विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली आहे.  शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना यांच्यावतीनं बंदची हाक देण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सोलापुरात नामांतराविरोधात दोन मतं होती. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपुरात सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. त्यानंतर या नामांतरावर लिंगायत समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली.

लिंगायत समाजाकडून सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचं नाव देण्याची मागणी होती. तर धनगर समाजाकडून विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं अशी मागणी होती.

विद्यापीठाच्या नामांतरासाठी सुरुवातीला धनगर समाजाने सुरुवातीला मोर्चा काढला. त्यानंतर लिंगायत समाजाने 18 सप्टेंबर रोजी विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण शिवयोगी सिद्धेश्वर नाव देण्याची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?

शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत. 12 व्या शतकातील या महापुरुषाने लोकोद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. सिद्धरामेश्वरांच्या कार्याचा दाखला देऊन, त्यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व मठांनी आणि देवस्थानांनी केली होती.

दुसरीकडे धनगर समाजाने विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी लढा उभा केला होता. ऑगस्टमध्ये धनगर समाजाने विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी केली होती. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला शिवसेनेसह इतर समाजिक संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला होता.

पण नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचं नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली. त्यामुळे लिंगायत समाज नाराज झाला. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना आदी संघटनांनी आज सोलापूर बंदची हाक दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments