Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपानं शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा चुराडा केला - अरविंद केजरीवाल

भाजपानं शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा चुराडा केला – अरविंद केजरीवाल

सिंदखेडराजा – भाजपानं शिवाजी महाराजांचा आणि सावित्रीबाईंच्या स्वप्नांचा चुराडा केला. ज्यांना शाळा निट चालवता येत नाही ते, राज्य काय चालवतील अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केली. केजरीवाल आज राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सिंदखेड राजा बुलडाणा जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांची महाराष्ट्र संकल्प सभा पार पडली.

केजरीवाल यांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दर्शन घेतले. त्यानंतर ‘महाराष्ट्र संकल्प’ सभा संपन्न झाली. यावेळी केजरीवाल यांनी भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. सभेच्या ठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीला केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी केजरीवालांच्या सभेला परवानगी देण्यात आली होती. यामुळे केजरीवालांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सिंदखेडराजा येथे १२ जानेवारीला साजरा करण्यात येतो. दरवर्षी ५ ते ६ लाख लोक या कार्यक्रमाला येत असतात. त्यामुळे अधिक गर्दीच्या कारणावरून पोलिसांनी सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या केजरीवाल यांच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली होती. मात्र, आता त्यांच्या या नियोजित सभेला परवानगी देण्यात आली असून केजरीवाल सिंदखेडराजासाठी रवाना झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सवास खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजीराजे भोसले हे तीनही राजे सिंदखेडराजा येथे दाखल झाले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments