Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचे स्वबळावर लढण्यासाठी मातोश्रीवर खलबते

शिवसेनेचे स्वबळावर लढण्यासाठी मातोश्रीवर खलबते

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला नाही. शिवसेना विधानसभा स्बभळावर लढण्याच्या तयारीत असून आज दुपारी राज्यातील सर्व पदाधिका-यांची तातडीने बैठक बोलावली आहे.

शिवसेना आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यासाठी इच्छूक आहेत. दोन्ही पक्षांना एकहाती सत्तास्थापन करण्याचा डाव आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिका-यांची चर्चा करून पुढील घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी काही कार्यक्रमांमध्ये युती करून लढणार असे सांगितले होते. मात्र अद्यापही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची व कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्बळावर लढण्यासाठी इच्छूक आहेत. स्बळावर लढल्यानंतर भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची खात्री आहे, त्यामुळे भाजपाने अद्यापही अधिकृतपणे भूमिका जाहीर केली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments