Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपची चार जणांची तिसरी यादी जाहीर; ‘त्या’ चार ज्येष्ठांना डावलले

भाजपची चार जणांची तिसरी यादी जाहीर; ‘त्या’ चार ज्येष्ठांना डावलले


मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार जणांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये शिरपूर मतदारसंघासाठी काशीराम पावरा, साकोली मतदारसंघासाठी परिणय फुके, मालाड पश्चिम मतदारसंघासाठी रमेश ठाकुर आणि रामटेक मतदारसंघासाठी मल्लिकार्जून रेड्डी यांची नावे आहेत.

दरम्यान, भाजपकडून अध्यापही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री प्रकाश मेहता या नेत्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी नेमकी केव्हा जाहीर होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments