Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रभुसावळमध्ये भाजप नगरसेवकासह चौघांची हत्या !

भुसावळमध्ये भाजप नगरसेवकासह चौघांची हत्या !

BJP ravindra kharat murder भुसावळ : भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात  (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत. नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर सलग दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. यापूर्वीही खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता. त्यावेळी या हल्ल्यातून खरात थोडक्यात बचावले होते.

या विषयी अधिक माहिती अशी की, भुसावळमधील समता नगर येथील भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात हे रविवारी रात्री आपल्या कुटुंबियांसोबत घरातच होते. त्याचवेळी काही हल्लोखोरांनी जुन्या वादातून खरात यांच्या घरावर हल्ला केला. गोळीबार सुरु केला. यामध्ये त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात आणि सुमित गजरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

हल्लेखोरांच्या गोळीबारात रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एकव्यक्ती असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्ला करणारे आरोपीही या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोपींनी हल्ला केल्यानंतर खरात यांच्या कुटुंबियानीही गोळीबार केला. त्यामुळेच हे तिघे जखमी झाले.

या प्रकरणी संशयित राजू उर्फ मोसिन शेख अजगर खान, मयुरेश सुरवाडे, शेखर मोघे या तिघांना अटक केल्याचं जळगाव पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी माध्यमांना सांगितले. हल्लेखोरांनी कोणत्या कारणामुळे हल्ला केला. त्याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे भुसावळ शहरात तणाव निर्माण झाला आहे.

नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर सलग दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. यापूर्वीही खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता. गावठी पिस्तूलातून हवेतून तीन फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी या हल्ल्यातून खरात थोडक्यात बचावले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments