Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरअण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात  शुक्रवार पासून एल्गार!

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात  शुक्रवार पासून एल्गार!

ANNA Hazare

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गाराची हाक दिली. २३  मार्च  शुक्रवार पासून जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्याची टीका, यावेळी अण्णा यांनी केली. 

लोकपालची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष…

आपण लोकांसाठी आंदोलन करत आहे. हार्ट ॲटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात सहभागी झालेल्यांकडून पत्र लिहून घेणार

दरम्यान,यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून राजकारणात जाणार नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहोत, असे अण्णा यांनी स्पष्ट केले. याआधीची टीम अण्णा फुटली किंवा ती फोडण्यात आली. ती फुटली नसती तर देशाचं चित्र खूप सुंदर राहिलं असंतं. टीम अण्णा फुटल्यामुळं देशाचं नुकसान झालं, अशी खंत हजार यांनी व्यक्त केली.

गिरीष महाजन यांना अपयश…..

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आंदोलन करु नका अशी विनंती केली. पंरतु अण्णा हजारे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल नाराजी व्यक्त करत ४२ पत्रांना मोदींनी उत्तर दिली नाही. लोकपालासाठी मोदी आग्रही नाही अशीही खंत व्यक्त केली. यामुळे महाजन हे खाली हाताने परतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments