Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रअश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

महत्वाचे….
१.पोलिस कोठडीत हत्या ही सुपारी घेऊन करण्यात आली. कुटुंबियांचा आरोप २.बॅग हाऊसमध्ये महिलांचं अश्लील चित्रिकरण करुन त्याच्या सीडी बनवनल्याची माहिती अनिकेतला होती. ३.अनिकेतच्या हत्येला लागलय वेगळ वळणं.


सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सांगलीच्या अनिकेत कोथळेची सुपारी देऊन हत्या करण्यात आली, असा खळबळजनक आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे. त्याच्या हत्येची सुपारी पोलिसांनाच दिल्याचा दावाही अनिकेतच्या भावाने केला आहे.

“अनिकेत जिथे कामाला होता, त्या लकी बॅग हाऊसमध्ये तिथे महिलांचं अश्लील चित्रिकरण करुन त्याच्या सीडी बनवल्या जात होत्या. याची माहिती मिळल्यानंतर अनिकेतने पत्नी आणि भावाला कल्पना दिली. त्यानंतर काम सोडत असल्याचं सांगत अनिकेतने मालकाकडे एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली.

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

परंतु इथे सुरु असलेला प्रकार अनिकेतच्या लक्षात आल्याचं मालकाला समजल्यानंतर त्याने पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे यांना त्याच्या हत्येची सुपारी दिली. अनिकेतवर चोरीचा खोटा आळ घेण्यात आला आणि पोलिस तपासादरम्यान अनिकेतची हत्या करण्यात आली,” असा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना वकीलपत्र देण्यात यावं. तसंच अनिकेच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी अनिकेतच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments