सांगली– अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात योग्य दिशेने तपासात होत नाही. असा आरोप करुन मृतक अनिकेतच्या दोन्ही भावांनी सांगलीत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला.पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
अनिकेतच्या तपासात काही निष्पन्न होत नाही. तसेच तपास योग्य रितीने होत नाही, असा आरोप करत दोन्ही भावांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
सांगली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी आशिष कोथळे आणि अमित कोथळे या दोन्ही दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह ५ पोलिसांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे. याप्रकरणात आतापर्यंत १२ आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.