Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रयेत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू होणार

येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू होणार

मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.

याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी अनेक बैठका झाल्या. आता अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार’, अशी माहिती सामंत यांनी दिली.

सामंत पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसे राहणार नाही. याबाबत जी आर काढण्यात आला आहे. तसेच, जे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments