Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार, तर तीन जागा काँग्रेसला : अजित...

पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार, तर तीन जागा काँग्रेसला : अजित पवार

पुणे : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागा वाटपाचा तिढा सोडवला. मात्र, जागांची अदलाबदल करणार असल्याने पुण्यातील आठ जागांबद्दल सभ्रम कायम होता. त्यावरील पडदा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दूर केला. पुण्यातील आठ जागांपैकी चार जागांवर राष्ट्रवादीला लढणार असून, तीन जागा काँग्रेस तर एक जागा मित्र पक्षाला देण्यात आली आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पुण्यात झाला. यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाची माहिती दिली. ते म्हणाले, “हडपसर, खडकवासला, पर्वती, वडगावशेरी हे चार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघ मित्रपक्षाला देण्यात आला आहे. यासह सर्व जागा पुढील आठ दिवसात दोन्ही पक्षातील नेते मंडळी एकत्रित बसून जाहीर करतील. भाजपा आणि सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार नाही, तोवर आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करणार नाही,” असे अजित पवार म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं जागा वाटपा जवळपास निश्चित झाल आहे. त्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात दिली होती. “विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस १२५, राष्ट्रवादी काँग्रेस १२५ जागांवर लढणार आहे तसंच मित्र पक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहेत. हा फॉर्म्युला ठरला आहे,” असं शरद पवार म्हणाले होते. तसेच शरद पवार यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांच्या नावांची घोषणाही केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments