Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्र'आप’चे ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ पकडणार

‘आप’चे ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ पकडणार


माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी तीन वाजता पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत. रविवारी मुंबईतील टिळकभवन येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे. यामुळे कोकणात पक्षाला पुन्हा उभारी मिळेल.

सुधीर सावंत यांनी तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा दिवंगत प्रभा राव आणि प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. 2008 ला पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी  करण्यात आली होती. त्यानंतर मायावतींच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश करून महाराष्ट्रात काम केलं होतं. यानंतर आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद सांभाळून काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. एवढा सगळा राजकीय प्रवास करून ते पुन्हा एकदा स्वगृही प्रवेश करत आहेत.

सावंत यांच्या प्रवेशामुळे कोकणात काँग्रेसला बळ मिळेल. सावंत यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे कोकणात पक्षाला पुन्हा उभारी मिळेल अशी पक्षाची  भावना आहे.

सुधीर सावंत यांचा परिचय…

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामावर प्रभावित होऊन 1991 ला काँग्रेस प्रवेश

1991 साली कोकणातील तेव्हाचा राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

माजी केंद्रीय रेल्वेमंत्री राहिलेल्या दिवंगत मधू दंडवते यांचा पराभव करून लोकसभेवर निवडून गेले.

लोकसभेत काँग्रेसच्या संसदीय समितीचे सचिव म्हणून काम केलं.

1998 ला काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव म्हणून काम केलं.

2002 ला विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती, काँग्रेसची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी सांभाळली

2005 ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पक्षावर नाराज

2005 ते 2008 तीन वर्षे पक्षात राहून कोकणात नारायण राणेशी संघर्ष केला

2008 ला पक्षविरोधी भूमिकेमुळे पक्षातून हकालपट्टी

इतर राजकीय पक्षांमध्ये काम करून सावंत आज पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार आहेत. त्यामुळे कोकणात कार्यकर्त्यांना बळ मिळेल अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आशा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments